Self Discovery Through एकांत: स्वतःला ओळखण्याचा प्रवास
कुणी विचारलं एकांत म्हणजे काय?
त्यावर माझं सोपं आणि साधं उत्तर असेल स्वतःला मिळालेला वेळ किंवा स्वतःला ओळखण्यासाठी दिलेला वेळ. सोबतीला मित्र, कुटुंब, नातेवाईक तिथे कोणी नसतं तिथे आपण स्वतःला वेळ देत ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. असं मला वाटते. कारण बघा ना! जिथे फक्त आपणच असतो अन् आपले विचार चालू असते. पुढे काय करायचं आता पर्यंत काय चुकलं त्यावर विचार चिंतन सतत चे चालू असते. ते म्हणतात ना स्वतःला वेळ देत राहिलो ना तर नक्कीच काय तरी नवीन करण्याची तीव्र इच्छा शक्ती जागृत होते. जिथं आपण आपल्या क्षमतांचा विचार करतो ,ओळखतो, त्यावर काम करायला सुरू करतो हे नक्कीच अद्वितीय आहे खरंच ना!
स्वतःला वेळ देण्याचे फायदे
स्वतःला वेळ हा दिलाच पाहिजे. ते आवश्यक आहेच. जिथे आपण आपल्याला बघत असतो. आपल्या क्षमता बळकटी देत असतो. त्यावर योग्य तो विचार करतो. आता असं वाट्टेल की खरंच आवश्यक आहे का स्वतःला वेळ देणं. तर माझं मत आहे नक्कीच आवश्यक आहेच.
• मनातील ताण कमी होतो.
मानसिक शांती साठी तरी वेळ दिलाच पाहिजे. आज मानसिक शांती कशी मिळवावी ह्यावर सेमिनार होतात. कुणाला काही एक समजत नाहीये. या साऱ्या धावपळीच्या काळात आपण हरवून बसलोय स्वतःला त्यामुळे वेळ देणं नक्कीच आवश्यक आहे.
• विचारात तारतम्य येतं.
विचार अगदीच स्पष्ट होऊ लागते. हे सगळं काही आपण आजच्या काळात विसरत चाललोय ते पुन्हा एकदा नव्याने नीट करणे महत्त्वाचे आहे. विचारात सकारात्मकता हवी. आणि शुद्ध विचार क्षमता असायला पाहिजे. दुसऱ्याच्या विचारानं नाही तर स्वतःच्या विचाराने चालायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारात नीट स्पष्टता येऊ शकते.
• स्वतःच्या भावना व उद्दिष्टांना स्पष्टता मिळते.
भावना जपणे स्वतःच्या पण आणि दुसऱ्यांच्या हे खूप गरजेचे आहे. दुसऱ्याचा भावनिक आधार बनलात तर आयुष्यात जिंकू असं काहीसा असते. भावनिक स्पष्टता असणे फार महत्वाचे असते.
जीवनात काय करायचे आहे? आपला Final Destination कुठलं? हे कुणाकडून माहिती करून घेतल्या पेक्षा ते आपण स्वतःला समजणे जास्त आवश्यक असते. कुणी काही पण सांगेल मग काय त्यावर अंध विश्वास ठेवायचा का तर मुळीच नाही. आपल्यात कोणते कौशल्य आहे? त्यात आपण स्वतःला कसे बरे सिद्ध करू शकतो हे समजणे महत्त्वाचे आहे.
मनशांती ठेवण्याकरिता एकांत का आवश्यक आहे?
या आजच्या धावपळीच्या काळात तर आपण आपल्याला वेळ देणं तर विसरून गेलोय. त्यात मनाची होणारी चिडचिड, अशांतता हे सगळं कसं एकदम मनाचं ओझं वाढवणारे असते. सततची धावपळ कामे, उठल्यापासून ते झोपेपर्यंत डोक्यात कितीतरी विचारांचे काहूर माजलेले असते. आज हे करू उद्या ते करू कधी होते तर कधी ते राहूनच जाते. नियोजनाची घडी सुद्धा कधीमधी नीट बसत नाही. तेव्हा स्वाभाविक मन अशांत होतेच.
मानसिक शांती साठी बरेच लोकं ध्यान करतात, किंवा अध्यात्म भक्ती मार्ग स्वीकारतात. नाम स्मरण करतात. तिथे एक वेगळीच शांतता लाभते. जी एक प्रकारे मनाचे प्रबळ शक्ती देतं. आत्मविश्वास वाढवतो.
अश्याच अशांत मनाला एक प्रकारे शांत करण्याकरिता एकांत भेटणे जरुरी आहे. कधी कधी काही गोष्टी ह्या कुणाला सांगून मनाला शांती मिळत नाही. किंवा मग कुणी तशी व्यक्ती आयुष्यात नसते. अश्यावेळी मग एकांत हे कामी पडते ना.