पिसांची लेखणी म्हणजे काय? | Quill Pen History, Structure and Uses
पिसांची लेखणी सगळ्यांनी कुठे ना कुठे तरी पाहिलीच असणार. कोणत्या एका ऐतिहासिक चित्रपटांत किंवा मग अन्य कुठे चित्रात बघितले असेल. तर बघा सगळ्यात पहिली लेखणी म्हणून देखील ह्या लेखणी ला ओळखतात. शाई मध्ये एखाद्या पक्ष्यांच्या पंखांचे तुटलेले एक पंख ला टोकदार बनून घ्यायचे आणि ते शाईमध्ये बुडून लेखन केले जात असे. आज जेव्हा आपण प्राचीन एकदम जुने ग्रंथ झाडाच्या सालीवर लिहिलेले जे अक्षर होते ते ह्याच लेखणीच्या सहाय्याने लिहिलेलं दिसून येते. एवढंच काय आपण जी आज बॉलपेन वापरतो त्याच्या आधी ह्या लेखणीचा वापर सगळी कडेच होत असावा. त्यानंतर गरजेनुसार बदल होत गेले अन् फाऊंटन पेन बॉलपेन असे नवनवीन बदल लेखणीत दिसून आले.
पिसांची लेखणी
प्राचीन काळी ह्या लेखणी चा जास्त प्रमाणात वापर होत असे. मध्ययुगीन काळात देखील वापरत होती. काही पक्षांची पिसांच्या द्वारे ही लेखणी तयार केली जाते. अधिकच्या माहितीसाठी बघितले तर हंस आणि टर्की ह्या पक्ष्यांचे पंख लेखणी म्हणून वापरायला जास्त उपयोगी पडत असे. पिसाचे खालचे टोक हे तीक्ष्ण असल्याने लिखाण करताना नीट आणि शुद्ध अक्षर येतं. ह्यावरून हा लेखणीचा प्राचीन आहे असं दिसून येते. तर बाह्य अंगाने शाई मध्ये त्या लेखणीचे टोक बुडवावे लागते. व नंतर लेखण करता येत होतं. अशी काहीशी रचना दिसून येते.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात यामध्ये सुधारण होऊन लेखणीचे प्रकार मध्ये बदल झालेला दिसून येतो. जसे की, आज लेखणीला आपण पेन म्हणतो. त्यात शाई ही आधीपासूनच साठवली असते. Dip पेन, फाऊंटन पेन, Gel पेन, मार्कर पेन आणि बॉलपेन असे काही प्रकार दिसून येतात.
लेखणी ची रचना
पिसांची लेखणीची रचना ही इतर लेखणी पेक्षा वेगळी होती. पिसाचे टोक तीक्ष्ण करून त्याला लेखन करण्यायोग्य करून शाई मध्ये बुडवून लेखन कामात आणले जात होते. टोकाला लागलेली शाई जशी वाळेल तसं मग पुन्हा शाईमध्ये बुडवून लेखन केले जात होते. बाकीच्या लेखणी ह्या अंतर्गत शाई व्यवस्थापित असते. म्हणजेच त्यामध्ये आतच शाई ची व्यवस्था केलेली असते. तसं यात काहीही नव्हतं कारण ही एक सुरुवात होती ना जशी जशी गरज वाढत गेली तशी रचना ही बदलत गेली.
लेखणीचा वापर
प्राचीन काळी सगळ्यात जास्त वापरत होती आणि मध्ययुगीन काळात देखील वापरत असलेलं दिसून येते. अगदीच मग नवीन लेखणी प्रकार समोर येई पर्यंत वापर चालू होता. तत्कालीन काळातील काही चर्मपत्रे, झाडाच्या सालीचे कागद वरचे लेखन असेल. तर त्यामध्ये ह्या लेखनिद्वारे कसे लिखाण झाले किंवा कसे अक्षर येत असे हे त्या हस्तलिखित ग्रंथ द्वारे बघायला मिळते. अधिकच माहिती बघितली तर जुनी ग्रंथसंपदा, अशा अनेक पुरावे मिळतील त्यात ह्या लेखणी आधारे लेखन केलेले दिसून येते.
आधुनिक काळात पिसांच्या लेखणीचे स्थान
हे एक महत्वाचे आहे. की, आजच्या ह्या काळात जिथे लेखणीचे अनेकानेक प्रकार आता आहेत. तिथं Quil Pen चे काय स्थान आहे? हा सर्वसमावेशक प्रश्न पडला असेलच.
Caligraphy कला -
तेव्हाची लिपी कशी होती? ह्यावर बरेच संशोधन होऊ शकते. Quil Pen च्या माध्यमातून देखील इतके सुंदर अक्षर येऊ शकते. ती कार्य कशी करते. हे सगळं काही नक्कीच कुतुहलाचा विषय आहे.
ऐतिहासिक प्रदर्शन -
काही लोकांचा छंद असतो की, जुन्या वस्तूंचा संग्रह करून ठेवायचा. आता माझा एक अनुभव सांगतो. मी एका प्रदर्शनात गेलो तेव्हा तिथे असेच बरेच वस्तू होत्या त्यात लेखणी होत्या. आणि हे पिसांची लेखणी देखील माझ्या नजरेत पडली. संग्रह करणारा देखील मोठा व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं सगळी माहिती दिली. कसा सगळ काही गोळा केलं वगैरे विषयी सांगत होते.
संग्रहालय -
मोठ्या मोठ्या शहरात अशा प्राचीन वस्तू ठेवत असतात. तिथे ते Quil Pen आणि तिच्या आधारे काही लिपी होती तो एक नमुना (Sample) ठेवला जातो.
शैक्षणिक अभ्यास -
बरेच संशोधन केले जाऊ शकते. अशी लेखन आहे. PhD Student साठी देखील हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो. आणि बऱ्याच अभ्यासक्रमात ह्याच्याविषयी माहिती देखील मिळते.
अशा प्रकारे पिसांची लेखन ही प्राचीन काळात पासून वापरत असलेली पहिली पेन मानली जाते. समोर मग सुधारणा होत होत नवनवीन प्रकार आले.