लेखणी - एक लिखाणाचे साहित्य

लेख परिचय - आपल्या शालेय वयापासून ते आयुषयभरासाठी आपल्या सोबत असणारे साहित्य म्हणजेच लेखणी किंवा पेन होय. कागदावर एखादी रेष जरी काढावयाची असेल तर आपण लेखणी ची मदत घेतो. अशी ही अद्वितीय साहित्य आहे. हे  अती प्राचीन काळी शोधले गेलेलं साहित्य आहे. त्यामध्ये अनेक बदल झालेत पण त्याचे कार्य व त्याचे वैशिष्टे ह्यांमध्ये मात्र कसल्याही प्रकारे बदल झाला नाही. ते आजच्या ह्या लेख मध्ये आपण ह्या साहित्य विषयी माहिती बघू. 

लेखणी - प्राचीन काळी जेव्हा लिखाण तंत्राचा शोध लागला. तेव्हा एक पिस पेन नामक एक लेखणीचा वापर केला जात असे. नंतर काही सुधारणा होऊन त्यामध्ये बरेच प्रकार आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. लेखणी म्हणजे लिखाण करणारे साहित्य होय. 
              लेखणी ही संकल्पना प्रत्यक्षात लिखाण संबंधी आहे. एका शाई द्वारे हे साहित्य चालत असते. म्हणजेच एखाद्या कागदावरी एखादी रेष किंवा अक्षर काढावयाचे जरी असेल तरी शाई ही त्या लेखणी मध्ये असणे खूप महत्त्वाचे असते. म्हणजेच शाई ही लेखणी वीना अपूर्ण असते. तर लिखाण साठी कागद हे साधन हवे असते. 
                                
                           

लेखणीचा वापर - 
              लेखणी ह्या साधनाचा वापर हा प्रत्यक्ष एखादे लिखाण करण्यास वापर केला जातो. मग त्यामधे शालेय कार्यातील बरेच लिखाण कार्य असेल, किंवा आपले औपचारिक कार्य मधील लिखाण कार्यात आपण पेन चा वापर करत असतो. आपल्या दैनंदिन कार्यामध्ये ह्या साधनाचा खूप महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. लेखणी ही लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना समान मदत करते. 
                 प्राचीन काळी जेव्हा ह्या लिखाण संकल्पनेचा शोध लागला. तेव्हा त्याकाळातील ग्रंथ संपदा ही लेखणीचा वापर करून लिहिली गेली. तत्कालीन पिस पेन ह्या लेखणी च्या मदतीने त्याकाळी ग्रंथ लिहिले जात असत. लिखाण कार्यात काळानुसार छपाई यंत्र आलेत म्हणजेच छपाई यंत्राद्वारे पुस्तके लिहिली जायची त्यामध्ये पूर्वी सारखं लिखाण करता यंत्र द्वारे लिखाण होत असे. पण त्याचा परिणाम हा लेखणीवरती नाही पडला लेखणी ही आज पण मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तर ह्या श्रेणीमध्ये लेखणीचे प्रकार वाचायला मिळेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी व्दारे नक्की कळवा.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url