Technology: The Path Towards Progress | तंत्रज्ञान – प्रगतीकडे नेणारी वाट

एक असं क्षेत्रं ज्यामुळे संपूर्ण मानवी जीवन व जग बदलून टाकले. नवनवीन प्रयोग व साधन याव्दारे तंत्रज्ञान मध्ये मोलाची भर पडली. मानवी जीवनाचा जगण्याचा दर्जा उंचावला तो एका तंत्रज्ञान क्रांती मुळेच हे म्हणणे तितकेच योग्य ठरेल. जग हे एका नवीन अधूनिक क्षेत्रं कडे नव्याने पाऊल हे तंत्रज्ञान ह्या एका संकल्पना द्वारेच हे म्हणणे हे खरेच होय. एवढेच नव्हे तर, काम करण्याची पद्धती मध्ये एक नवीनतम बदल दिसून आला आहे. स्मार्टफोन, संगणक ह्यात वाढते प्रकार दिसून येत आहेत. त्यात नवनवीन असे बदल सुद्धा होताना दिसत आहेत. सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल की, AI एक कृत्रिम बुद्धिमत्ता छोटी मोठी काम डिजिटल पद्धतीने करून देणारी एक नवीन संकल्पना होय. 


तंत्रज्ञान

हे क्षेत्रं आधुनिक काळातील मानवी जीवनाचा प्रथम पाऊल होय. पूर्वी चे मानवी जीवन व आजचे मानवी जीवन ह्यामध्ये भरपूर प्रकारात फरक आहे. मानवी जीवनाने घडवून आणलेला हा बदल त्याचेच जीवन बदलून गेला. मानवाचा ह्या पृथ्वी तळावरील जन्म व तेथपासून ते आज पर्यंत तो आपल्या प्रयत्नांच्या व मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहचू शकला हे महत्वाचे आहे.

                                   

तंत्रज्ञान युगा पूर्वीचे जीवन -

ही अभूतपूर्व क्रांती होण्याअगोदर मानव हा एका सर्व सामान्य पणे राहत असे. कुणाकडेच आजच्या काळात जसे साधन आपल्याला बघायला मिळतात तसे साधन दिसत नसे. तर सामान्यपणे राहणीमान होते. एका छोट्या क्रिया त्याच्या समोर घडत गेल्या त्यावरून ही क्रिया अशीच का घडते. ह्यामागे काय कारण ह्याची नीटपणे पाहणी करणे, निरीक्षण करणे, त्या क्रियेवरून निष्कर्ष काढणे. ह्यासगळ्या वरून शोध नामक संकल्पना त्याच्या मस्तकी आली आणि मग काय एक - एक करून शोध घेत त्याचे राहणीमान तो स्व कष्ट - मेहनत - परिश्रम द्वारे तो एक सामान्य मानवी जीवनापासून एका आधुनिक काळात प्रवेश करत गेला. आणि आज आपण ह्यामध्ये अनेक प्रकारामध्ये सुधारणा करत आहोच. 


तंत्रज्ञान युग 

आजच्या ह्या तंत्रज्ञान युगामध्ये आपण आज हाताळत असलेले साधन, राहत असलेला निवारा असेल किंवा अनेक नवनवीन साधन सामुग्री हे सर्व तंत्रज्ञान युगामध्येच निर्माण झाले. अनेक प्रकारामध्ये बदल देखील ह्याच युगामध्ये झाले आहे. नवनवीन साधन निर्माता व आधुनिकीकरण युगाला प्रारंभ हा तंत्रज्ञान द्वारेच झाले आहे.


दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी -

दळणवळण म्हणजे एका ठिकाणवून दुसऱ्या ठिकाणी माहिती, मालवाहू घेऊन जाणे किंवा ने- आण करणे हे येते. जसे की, आज बघितल तर भू-मार्ग, जलमार्ग, हवाईमार्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचे इंटरनेट एक डिजिटल वाहक म्हणता येईल.  उदा. पत्र व्यवहार हा पूर्वी कबुतर पक्षी च्या माध्यमातून होत असे, पण आता मात्र ते त्याचे स्वरूप बदलेले आहे ना, आणि मालवाहू पूर्वी प्राणी ची मदत घेतली जात असे आणि आता मात्र ह्यात झालाच ना बदल मग हे असं असते.


आताच्या काळात त्यात कसा बदल झाला. तंत्रज्ञाने त्याला पूर्ण बदलून टाकले. ईमेल, Call Service ह्या सगळ्या नवीन सेवा जे आहेत त्या उदयास आल्या आहेत. त्यामुळे काय ही दळणवळण जे आहे ते एकदम सोपे झाले. त्यात आता कुठल्याही पक्षी वापरला जात नाही. मोबाईल मार्फत एकाच क्लिक वर इकडला संदेश तिकडे जाऊन पोहचतो. समाज माध्यम आलीत ज्यामुळे अजूनच संवाद वाढत गेला आहे. एकदम सुपरफास्ट पद्धतीने इंटरनेट मुळे ह्या सगळ्याला गती मिळाली. 


शिक्षण क्षेत्रातील गतीला चालना -

पहिले आणि आता पण काही ठिकाणी ऑफलाईन क्लासेस सुरू आहेतच पण आत्ताच्या ह्या डिजिटल युगात त्याच स्वरूपात बदल झालेला आहे. ते ऑनलाईन स्वरूपात चालू आहेत. उदा. Testbook, PW असे काही ऑनलाइन Live Streaming Through Teaching Comapny आहेत. Educators Online आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षण घेतात. एक नवीन क्रांतीच म्हणावी लागेल.


वैद्यकीय क्षेत्र विकास -

वैद्यकीय उपकरणे ह्यात देखील नवनवीन बदल झालेलं दिसून येत आहेत. पेशंट check-up साठी एकदम अशी नवीन मशीन तंत्रज्ञान सुधारणा झालेली दिसून येत आहेत. आधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत. Smart Watch मध्ये Health Related Apps System Apps Available झालेली आहेत. एकदम पूर्ण सगळं काही बदलून गेलं आहे.


आर्थिक व्यवहार व डिजिटल सुरुवात -

बँकिंग क्षेत्रात आधुनिक विकास झालेला खऱ्या अर्थाने दिसून येतो. ऑनलाइन पेमेंट्स, Apps वगैरे सगळं काही नवीन आलेलं आहे. डिजिटल पेमेंट किंवा कॅशलेस मोड पेमेंट ही एक नवीन पद्धती ह्या काळात दिसून आली. आता बँकेत रांगेत उभे राहून काम करण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीने त्या त्या अँप मधून काम करू शकतो.


शेती व तंत्रज्ञान -

शेतीशी संबंधित अनेकानेक नवीन उपकरण येणे चालूच आहेत. ज्यात उदा. ट्रॅक्टर हे एक सगळ्यात मोठं उपकरण म्हणू शकतो. आणि अन्य मशीन आधुनिक तंत्रज्ञान पद्धती नुसार विकसित होत आहेतच.


अशा प्रकारे एक अशी महत्त्वाची उपयुक्तता सांगता येऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाने आज सगळं काही साध्य होऊ लागलं आहे. ज्या करणे आज जग प्रगतीकडे वाटचाल करू लागत आहे.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url