लेख परिचय - निसर्ग हा सर्व सजीव सृष्टी चा निर्माता आहे. आज आपले अस्तित्व हे केवळ निसर्ग मुळेच आहे. इथे आपल्या सारखेच अनेक जीव किंवा प्राण्यांचा जन्म होतो. ते पण आपल्या सारखेच इथे जीवन व्यथित करतात. निसर्ग मुळे आपल्या सर्व सजीव सृष्टीच इथे जन्म होतो. ही निसर्ग नामक संकल्पना ह्या आपल्या पृथ्वबाहेर इतर कुठेच बघायला मिळत नाही. म्हणजेच काय तर इतर ग्रहवरती ही संकल्पना शोधून पण सापडणार नाही. अशी ही अद्वितीय संकल्पना आहे. तेव्हा आपले एक कर्तव्य म्हणून ह्या निसर्गाचे संवर्धन व संगोपन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपला जन्म व निसर्ग ह्याविषयी आजच्या लेख मध्ये महिती बघू.
निसर्ग - एक अशी संकल्पना जी कुठे वाचून व लिहून समजत नाही तर ह्याच निसर्गाच्या अनेक क्षेत्रामध्ये जाऊन तिथे निसर्गाचे दर्शन घेतले तरच ही अद्वितीय संकल्पना प्रत्यक्षात समजेल. ह्यावरून लक्षात येईल की निसर्ग ही किती मोठी अशी व्यापक संकल्पना आहे. ही कुठे शोधून नाही पण जिथे आहे ना तेथील क्षेत्राचे पूर्ण अंगाने भ्रमंती करून व त्याचे दर्शन घेऊन ती संकल्पना कळेल. येथे अनेक सजीव सृष्टी चे अस्तीत आहे. असे चित्र पृथ्वी बाहेर कुठे बघायला मिळत नाही. अशी संपदा टिकवणे हे आपले कर्तव्य आहे.
जन्मदिन - आपला जन्मदिन हा आपल्या साठी आपल्या आयुष्याचा खूप महत्वाचा दिवस असतो. म्हणजे ह्या दिवशी आपला जन्म झालेला दिवस होय. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस वर्षातून एकदाच येतो. आणि त्या दिवसाची आपण खूप वाट बघत असतो. तर काहींचा ह्या दिवशीचा ह्या दिवशी काय करायचे हे संकल्प ठरलेले असतात. असा हा जन्मदिन सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
जन्मदिन व निसर्ग प्रेम -
आपला जन्म झाल्यापासून जिथे आपण जीवन जगतो. ते म्हणजे निसर्ग होय. इथेच आपण लहानाचे मोठे होतो. येथील प्रत्येक घटक आपले जीवनात कधी ना कधी महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्न, वस्त्र व निवारा ह्या तीन मुख्य गरजा आपल्या येथूनच पूर्ण होतात. असे कितीतरी महत्व निसर्गाचे आपल्या जीवनामध्ये आहे. आपला जन्म हा ह्या निसर्ग सृष्टी मुळेच झाला आहे. हे खरेच आहे. आपल्याला लागणारा जीवन वायु म्हणजेच ऑक्सीजन हा वायू त्याच्या शिवाय कुठलाच जीव आपले जीवन जगू शकत नाही. तो देखील येथूनच मिळतो.
आजच्या काळात हे आपण स्वतः स्वार्थ करिता निसर्गाची पर्वा करत नाही त्याची निगा राखत नाही. निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. त्याकरिता सर्वापरी जबाबदार आपणच ठरत आहेत. तर त्यामुळे आज पासून एक संकल्प करू या आपल्या जन्म दिनी घरापुढे किंवा कुठल्याही परिसरात एक झाड लाऊया. हे सर्वांनी केले तरी निसर्ग संतुलित राहील.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिपण्णी द्वारे कळवा.
Nice Article
ReplyDelete