लेख परिचय - आजच्या काळातील आपले जीवन अतिशय गतीशील झालेले आहे. तंत्रज्ञान ह्या संकल्पनेने आपले सम्पूर्ण जीवन गतिशील करून अनेक शोध ह्या तंत्रज्ञान युगामध्ये लावले गेले तसेच आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार त्यात अनेक साधने विकसित झालेले आहेत. आज जर कुठे जायचे असेल तर काहीच वेळात आपण तिथे पोहचू शकतो. ह्यावरून असे लक्षात येते की आपले राहणीमान व अनेक काही कार्यात ह्यामुळे गती मिळाली तशीच एक प्रकारे गती आपल्या संपर्क साधण्यास मिळाली ती कशी मिळाली ती आजच्या लेख मध्ये बघु.
संपर्क व संदेशवहन - पूर्वीचे संदेशवहन व आजचे ह्यात खूप फरक दिसून येतो. ते कसे बरे तर ! पूर्वी माणूस इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधत असे तर आजच्या काळात तोच अप्रत्यक्ष पने साधताना दिसतो. पूर्वी संपर्काचे साधन उपलब्ध नव्हते तेव्हा एक व्यक्ती प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन संवाद करत असे. तर आज तोच एका जागेवरून एका तंत्रज्ञान साधनांद्वारे म्हणजेच भ्रमणध्वनी व्दारे तोच संवाद काहीच सेकांदामध्ये साधत असतो.आणि संदेशवहन च्या बाबतीत पण तसेच आहे. पूर्वी हे साधन उपलब्ध होते. त्याकाळी ह्या साधनाचे अनेक प्रकार उपलब्ध होते ते कसे आपल्या ब्लॉग वरती एका लेखाद्वारे बघूच तर आजच्या काळात त्याच संदेशवहनाचे जागा भ्रमणध्वनी ने घेतली आहे.
भ्रमणध्वनी - हे साधन आजच्या आधुनिक काळातील एक नवनिर्मित साधन आहे. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल आणि ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तिपासून दूर आहे. अश्या वेळेस ह्या भ्रमणध्वनी नामक संकल्पनेचा वापर केला जातो. तर संदेशवहन बाबतीत पण तसेच आहे. पूर्वीच्या काळी पत्र व्यवहार कागदी स्वरुपात होता. पण आजच्या काळात त्याचे स्वरूप बदलून गेलेले आहे. एका सेकंदात दुसऱ्या व्यक्तींशी पत्रव्यवहार हा भ्रमणध्नीवरून शक्य होतो.
भ्रमणध्वनी ह्या साधनांमध्ये काळानुसार अनेक बदल झाले आहे. ते कसे ? तर अगदीच ह्या यंत्राचा शोध लागला तेव्हा तो अगदीच साधा होता. आणि आताचा तुम्ही आणि मी वापरत असलेला भ्रमणध्वनी ह्यात खूप फरक आहे. तो शोध कोणी व केव्हा लावला हे आपण वैज्ञानिक शोध ह्या श्रेणी मध्ये लेख द्वारे बघू.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो एका टिप्पणी व्दारे कळवा.
Comments
Post a Comment