Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

वक्तृत्व कौशल्य

लेख परिचय -  दैनंदिन जीवनामध्ये आपण इतर व्यक्तींशी संवाद साधतो. मन मोकळे करतो. आपले स्वमत व्यक्त करतो. ते केवळ भाषेमुळे व आपल्या अंगी भाष्य कौशल्य विकसित असल्यामुळेच होय.  ह्या सर्व प्रक्रिया केवळ भाषेमुळे साध्य होऊ शकतात. बोलणे हे आपल्या मुखाने शक्य होते. भाषेतील वर्णमालेच्या नियमानुसार ओष्ट, कंठ, जीभ ह्या सारख्या बऱ्याच शरीराच्या आंतरिक भागातून ते बाहेर निघतात. हे कसे निघतात ते आपण स्वतः प्रयोग करून जिज्ञासा वृत्तीने ते ज्ञान आत्मसात करू शकतो. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल बोलणं ही प्रक्रिया कशी असते व ती काय प्रकारे सुरू होते. तर आजचा विषय वक्तृत्व  कौशल्य हा  आहे. त्याच्या विषयी आजचा लेख वाचा.  वक्तृत्व-   वक्तृत्व म्हणजेच भाषण होय. हे दोन एकच समानार्थी शब्द आहेत. हे असं कौशल्य आहे ना ते ज्यांनी आपल्यात विकसित केलं तो व्यक्ती कुठे ही मोकळे पणाने बोलू शकतो. त्या व्यक्तीस कसलेही भय नसते. वकृत्व म्हणजे काय तर ! व्यासपीठावरून प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधणे एक प्रकारचे संभाषण रुपी क्रिया असते वक्तृत्व कौशल्य आहे. वकृत्व ह्यालाच भाष...

चेतना

लेख परिचय - पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमधून मानव हा प्राणी बुद्धिमान समजला जातो. ह्या पृथ्वीवरती जन्म झाल्यापासून ते आज पर्यंत आपल्या बुद्धीच्या जोरावर तो विकास करत आज पर्यंत विकास करतच आहे. ह्या सर्वामध्ये बुद्धीची कसोटी लागते. विचापूर्वक निर्णय, जिज्ञासा, चिकाटी ह्या सर्व घटक एकत्र करूनच आपल्या बुद्धीने जो निर्णय ठरवलेला आहे तिथं पर्यंत पोहचण्यास मदत होते. म्हणजे एक प्रकारे क्रिया होते. ह्या सर्व क्रियेला चेतना म्हणतात. कोणती क्रिया कशी घडते ह्याची जाणीव म्हणजे देखील चेतना होय. ही एकदा सुरू झाली की मनातली किंवा बुद्धि मधील कल्पना प्रत्यक्षात निर्माण होते. हेच वैशिष्ट्य आहे आपल्या मानवी बुद्धीचे त्याकारणाने च मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. एखादी क्रिया घडणे किंवा सध्यस्थितीत बदल होणे म्हणजे चेतना होय.  बुध्दी - ही सर्व प्राण्यांमध्ये असते. पण निसर्ग नियमानुसार जेवढा प्राणी त्याची विचार करण्याची क्षमता तेवढी बुद्धीची व्याप्ती असते. सर्व सामान्यपणे बुद्धीचे कार्य सर्वच प्राण्यांमध्ये सारखेच असते. मेंदू ला बुद्धि हे टोपण नाव आहे. म्हणजे आपण सर्व सामान्यपणे आपण ...

आत्मविश्वास - स्व मनाची शक्ती

लेख परिचय - आपल्या दैनंदिन कुठल्याही कार्यात आपण मनाशी एक ठरवतो. की मी काय करावं ? किंवा मी हे कार्य कश्याप्रकारे करावे ? कोणत्या पद्धतीने करावे ? इत्यादी. तर कुठलेही कार्य करण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक विचार आवश्यक असते. आणि तो सकारात्मक विचार हा आपल्या मनातून निर्माण होतो. आणि पुढे तोच आपल्या आत्मविश्वास बनून आपल्या सोबत राहतो. च्यानंतर आपण ठरवलेलं कार्य करण्यास प्रारंभ केला तर ते कार्य चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला यश मिळतं.  सकारात्मक व नकारात्मक विचार - हे दोन आपल्या मनात असलेले विचार आहेत. विचार हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो कसा ? तर ! त्यामुळे आपण जे कार्य आपण हाती घेऊ तो पूर्णत्वास येते. त्यामध्ये आपले विचार महत्त्वाची भूमिका पार पाडतात.   १) सकारात्मक विचार - हा विचार नामक संकल्पनेचा प्रथम प्रकार आहे. असे म्हणतात की, कुठेलेही कार्य करताना व्यक्तीने नेहमीच सकारात्मक राहावे. कारण सकारात्मक विचार ही अशी ऊर्जा आहे आपण कुठलेही कार्य हाती घेतले असले तरी ते पूर्ण करण्याची क्षमता ही आपल्या मध्ये निर्माण होते. उदाहरण रुपी समजून घ्यायचे झ...