लेख परिचय - आपल्या दैनंदिन कुठल्याही कार्यात आपण मनाशी एक ठरवतो. की मी काय करावं ? किंवा मी हे कार्य कश्याप्रकारे करावे ? कोणत्या पद्धतीने करावे ? इत्यादी. तर कुठलेही कार्य करण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक विचार आवश्यक असते. आणि तो सकारात्मक विचार हा आपल्या मनातून निर्माण होतो. आणि पुढे तोच आपल्या आत्मविश्वास बनून आपल्या सोबत राहतो. च्यानंतर आपण ठरवलेलं कार्य करण्यास प्रारंभ केला तर ते कार्य चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला यश मिळतं.
सकारात्मक व नकारात्मक विचार - हे दोन आपल्या मनात असलेले विचार आहेत. विचार हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो कसा ? तर ! त्यामुळे आपण जे कार्य आपण हाती घेऊ तो पूर्णत्वास येते. त्यामध्ये आपले विचार महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
१) सकारात्मक विचार - हा विचार नामक संकल्पनेचा प्रथम प्रकार आहे. असे म्हणतात की, कुठेलेही कार्य करताना व्यक्तीने नेहमीच सकारात्मक राहावे. कारण सकारात्मक विचार ही अशी ऊर्जा आहे आपण कुठलेही कार्य हाती घेतले असले तरी ते पूर्ण करण्याची क्षमता ही आपल्या मध्ये निर्माण होते. उदाहरण रुपी समजून घ्यायचे झालेच तर ! "एक मुलगा आपल्या शाळेतील एका कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतो. वकृत्व स्पर्धा नामक एक कार्यक्रम असतो. आणि त्याचे गुरुजी कडे तो विचारणा करतो की मी माझे वकृत्व कौशल्य सादर करू शकतो का ? त्यावर त्याचे गुरुजी उत्तर देताना सांगतात. की, व्यासपीठावर जाताना कसल्याही प्रकारची मनात खंत ठेऊ नकोस. तर सकारात्मक वृत्तीने समोरच्या परिस्थितीला सामोरं जा आणि तो विद्यार्थी गुरुजी चे म्हणण्याप्रमाणे करतो आणि त्यास यश प्राप्त होते. अश्या प्रकारे सकारात्मक विचार हे आपले सोबती असते.
२) नकारात्मक विचार - हा मनाचा एक समज रुपी विचार असतो. नकारात्मक विचार हा दुसऱ्याचे नकारात्मक बोलने आपण मनात ठेऊन आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेलो तर ते कार्य पूर्ण कधीच होऊ शकत नाही. त्यामध्ये आपण कायम एका कल्पनेत असतो. मी हे केलं तर काय होईल ? हे कार्य मला जमेल का ? असे अनेक प्रश्न मनाच्या भोवऱ्यात भिरभिरत असतात. त्यालाच नकारात्मक विचारचक्र असे देखील म्हणतात.
आत्मविश्वास - आत्म + विश्वास = आत्मविश्वास. स्वः वरील ठाम विश्वास होय. हा आपल्या मनाची एक ऊर्जा व शक्ती आहे. जी आपल्या कार्यातून प्रदर्शित होते. ही ऊर्जा प्रत्येकामध्ये असते. एखादे कार्य स्वतः ला अवघड वाटत असेल तर ते पूर्ण ह्या ऊर्जेने होत असते. जीवनाच्या प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये वाटचाल करत असताना आत्मविश्वास ऊर्जेची सोबत असेल ना तर त्या प्रसंगमधून बाहेर पडण्यात ही आपली चांगल्याप्रकारे सोबती करतो. आत्मविश्वास हा प्रत्येकामध्ये असायलाच हवा त्यामुळे आपण जीवनातील कुठल्याही प्रसंगातून सहज स्वतः ला सावरु शकतो. आत्म + विश्वास = आत्मविश्वास. स्वः वरील ठाम विश्वास होय.
हा लेख तुम्हाला काय प्रेरणा देऊन गेला हे एका टिप्पणी द्वारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment