वक्तृत्व कौशल्य
लेख परिचय - दैनंदिन जीवनामध्ये आपण इतर व्यक्तींशी संवाद साधतो. मन मोकळे करतो. आपले स्वमत व्यक्त करतो. ते केवळ भाषेमुळे व आपल्या अंगी भाष्य कौशल्य विकसित असल्यामुळेच होय. ह्या सर्व प्रक्रिया केवळ भाषेमुळे साध्य होऊ शकतात. बोलणे हे आपल्या मुखाने शक्य होते. भाषेतील वर्णमालेच्या नियमानुसार ओष्ट, कंठ, जीभ ह्या सारख्या बऱ्याच शरीराच्या आंतरिक भागातून ते बाहेर निघतात. हे कसे निघतात ते आपण स्वतः प्रयोग करून जिज्ञासा वृत्तीने ते ज्ञान आत्मसात करू शकतो. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल बोलणं ही प्रक्रिया कशी असते व ती काय प्रकारे सुरू होते. तर आजचा विषय वक्तृत्व कौशल्य हा आहे. त्याच्या विषयी आजचा लेख वाचा.
वक्तृत्व- वक्तृत्व म्हणजेच भाषण होय. हे दोन एकच समानार्थी शब्द आहेत. हे असं कौशल्य आहे ना ते ज्यांनी आपल्यात विकसित केलं तो व्यक्ती कुठे ही मोकळे पणाने बोलू शकतो. त्या व्यक्तीस कसलेही भय नसते. वकृत्व म्हणजे काय तर ! व्यासपीठावरून प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधणे एक प्रकारचे संभाषण रुपी क्रिया असते वक्तृत्व कौशल्य आहे. वकृत्व ह्यालाच भाषण असं देखील म्हणतात. आता ह्या मध्ये बरेच विषय व प्रकार देखील आहेत. प्रेरणादायी भाषण, उपदेशपर भाषण, असे अनेक प्रकार ह्या भाषण अर्थातच वक्तृत्व कौशल्य मध्ये आहेत.
व्यासपीठ - वक्तृत्व कौशल्य सादर करावयाची जगेला व्यासपीठ असे म्हणतात. येथूनच हे कौशल्य सादर केलं जाते. श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद हा येथूनच साधला जातो. हे विशिष्ट उंचीचे असते. म्हणजेच श्रोत्यांच्या बसण्याच्या जागेच्या थोडं उंच भाग असतो.
वक्तृत्व सादर करावयाची पूर्व तयारी - ही अतिशय महत्वाचा भाग आहे. वक्तृत्व कौशल्य सादर कसे करावे ?, वक्तृत्व कौशल्याचा विषय कोणता ?, किती कालावधी असावा ?, हे सगळे पूर्व नियोजन वक्तृत्व कौशल्याचे असते. काही वेळा भाषणाचा पूर्व मसूद देखील तयार केला जातो. म्हणजेच काय विषय व त्यातील आतील गाभा वाचुन सादर केला जातो.
वक्तृत्व स्पर्धा उद्देश - ही स्पर्धा शालेय स्तरावरील एक स्पर्धा आहे. याचा उद्देश असा की, विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावे हा असतो. शाळेत घेतले जाणारे शैक्षणिक कार्यक्रम ह्या मध्ये विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर करण्यास सक्रिय सहभाग घ्यावा व भविष्यात कधीही कुठे पण वक्तृत्व सादर करण्याची संधी भेटली तर निर्भीडपणे वकृत्व सादर करता आले पाहिजे हा उद्देश असतो.
हा लेख कसा वाटला हे टिप्पणी द्वारे नक्की कळवा !