लेख परिचय - चित्रपट ही एक मनोरंजन संबंधी एक संकल्पना आहे. मनोरंजन मध्ये दृक - श्राव्य अश्या दोन्ही प्रकारे समावेश केला जातो. रेडिओ मधील गाणी हे फक्त ऐकू शकतो म्हणून ते श्राव्य प्रकारात येतं. तर चित्रपट सारखे मनोरंजन प्रकार जे डोळ्यांनी बघितले जातात व कानांनी ऐकले पण जातात तर ते दृक - श्राव्य ह्या प्रकारात येते. तर आजच्या लेख मध्ये मनोरंजन मधील एक अशाच प्रकार चित्रपट हे प्रत्यक्ष दाखवणारे यंत्र कोणी विकसित केलं ? ते कधी कोठे व केव्हा ? विकसीत झाले ह्या विषयी आजच्या लेखामध्ये अभ्यासणार आहोत.
लिओन बाउली - एक फ्रान्स चे शोधक होते. Cinematography ह्या नावाने हे यंत्र ओळखलं जाते. Cinematography हे नाव फ्रान्स चे शोधक लिओन बाऊली ह्यांनी हे सर्व प्रथम (१८९२) शोधेले. काही आर्थिक अडचणी मुळे ते ह्यामध्ये सुधारणा करू शकले नाही व नंतर ह्यांचे हे पेटंट लुमियरे बंधू ह्यांनी घेतले व त्यात सुधारणा केली.
लुमियरे बंधू -
ऑगेस्टे मेरी लुई निकोलस लुमियरे - एक जीवशास्त्रज्ञ, अभियंता व उद्योगपती त्याचप्रमाणे भ्रमवादी होते. भ्रमवादी म्हणजे दृश्य रुपाने एक चित्र उभे करणे. ह्यांनी व बंधू लुईस लूमियरे ह्यांनी चित्रपट छायांकन यंत्र द्वारे प्रथम चित्रपट प्रदर्शित केला. (१८९५) पुरस्कार- हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्टार (१९६०)
लुई जीन लुमियरे - एक अभियंता व उद्योगपती होते. चित्रपट छायांकन दृश्याचे दिग्दर्शक होते. पुरस्कार - ग्रँड लॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर (१९३९) हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्टार (१९६०)
चित्रपट छायांकन यंत्र -
१८९५ मध्ये ह्या cinematography नामक यंत्र लुमियरे बंधूंनी लिओन बौली ह्यांच्या कडून घेतले त्यामध्ये सुधारणा करून प्रथम चित्रण १८९५ मध्ये लुमियरे बंधूंनी केले. पुढे ह्यांसारखे अनेक यंत्र तयार झाली.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी द्वारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment