चेतना

लेख परिचय - पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमधून मानव हा प्राणी बुद्धिमान समजला जातो. ह्या पृथ्वीवरती जन्म झाल्यापासून ते आज पर्यंत आपल्या बुद्धीच्या जोरावर तो विकास करत आज पर्यंत विकास करतच आहे. ह्या सर्वामध्ये बुद्धीची कसोटी लागते. विचापूर्वक निर्णय, जिज्ञासा, चिकाटी ह्या सर्व घटक एकत्र करूनच आपल्या बुद्धीने जो निर्णय ठरवलेला आहे तिथं पर्यंत पोहचण्यास मदत होते. म्हणजे एक प्रकारे क्रिया होते. ह्या सर्व क्रियेला चेतना म्हणतात. कोणती क्रिया कशी घडते ह्याची जाणीव म्हणजे देखील चेतना होय. ही एकदा सुरू झाली की मनातली किंवा बुद्धि मधील कल्पना प्रत्यक्षात निर्माण होते. हेच वैशिष्ट्य आहे आपल्या मानवी बुद्धीचे त्याकारणाने च मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी समजला जातो. एखादी क्रिया घडणे किंवा सध्यस्थितीत बदल होणे म्हणजे चेतना होय. 

बुध्दी - ही सर्व प्राण्यांमध्ये असते. पण निसर्ग नियमानुसार जेवढा प्राणी त्याची विचार करण्याची क्षमता तेवढी बुद्धीची व्याप्ती असते. सर्व सामान्यपणे बुद्धीचे कार्य सर्वच प्राण्यांमध्ये सारखेच असते. मेंदू ला बुद्धि हे टोपण नाव आहे. म्हणजे आपण सर्व सामान्यपणे आपण बुद्धिमत्ता असे म्हणतो. मेंदूमत्ता म्हणत नाही. मेंदू हा अवयव चे नाव आहे आणि बुद्धि हे संबोधित नाम आहे. ह्यावरून मेंदू आणि बुद्धिमत्ता ही एकच हे समजले. तर आपण असे म्हणतो की माणसांच्या वयोमानानुसार मानवी बुद्धीचा बुध्यांक हा वाढत असतो. इथे आपण बुद्धि च्या जागी मेंदू हा शब्द घेतला असता तो आपल्याला समजण्यास अवघड गेलं असतं. त्यामुळेच टोपण नाव वापरलं जातं. सर्व प्राण्यांची बुद्धि व मानवी बुद्धि ह्याचे कार्य समान असते. फक्त फरक इथे असतो की त्याची विचार करण्याची व्याप्ती व क्षमता इथे मोठा फरक असतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मानव म्हणजे आपण विचार इतर प्राण्यांपेक्षा वेगळा करतो. म्हणून आपण  परिस्थिती बदलू शकतो. इतर प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. हे सर्व सामर्थ्य केवळ बुद्धीचेच आहे.

चेतना - ही सर्व क्रिया सर्व प्राणीमात्रांपेक्षा मानव मध्ये जास्त दिसते. म्हणजेच ह्या क्रियेची जाणिव फक्त मानवाला आहे. ती कशी तर आज पर्यंतचा विकास हा त्याचा पुरावा उपयुक्त ठरेल. आपल्या समोरील क्रिया कशी घडते हे प्रत्यक्ष शोध घेणे किंवा आपल्या त्वचे द्वारे आपल्याला थंड किंवा गरम हे जाणवते अश्या अनेक प्रकारची क्रियांना चेतना म्हणतात.
                            
                                     

      १) स्पर्श चेतना - वरील परिच्छेद मधील उदाहरण सारखे त्वचेला जाणवणारी कसल्याही प्रकारची स्पर्श चेतना मध्ये सामावली जाते. ह्यामध्ये जिभे वरची चव सामावली जाऊ शकते कारण जिभेला स्पर्श झाल्याशिवाय गोड किंवा तिखट हे कळत नाही. त्यामुळे जीभ ही स्पर्श चेतना दर्शवते.

       २) मानसिक चेतना - मनाच्या अंतर्गत अनेक विचाराचे ये जा सुरूच असते.त्यालाच मानसिक चेतना म्हणू. मनामध्ये सकारात्मक व नकारात्मक ह्या दोन विचार प्रवाह सुरू असतात. आणि आपण त्याआधारे देखील आपली क्रिया सुरू असते. आत्मविश्र्वास निर्मित ही देखील येथून होत असते. हे पण खरेच होय.

       ३) डोळ्यांची चेतना - ही प्राथमिक चेतना आहे असं मला वाटते. कारण सकाळी झोपेतून जागे झाले पासून रात्री झोपे पर्यंत हा प्रकार कार्यरत असतो. ह्या डोळ्यांच्या चेतन प्रकाराला जास्त आराम नसतो. डोळ्यांनी दिसत असलेली व समोर घडत असलेली क्रिया ह्या प्रकारात मोडते.

चेतना ही सर्व सजीवांमध्ये समान गुणधर्म असलेली एक क्रिया असते. ही सजीव असल्याची ओळख असं समजलं तरी योग्यच ठरेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला तो नक्की टिप्पणी द्वारे नक्की कळवा सोबतच तुम्हाला अधिकची माहिती माहीत असेल चेतना विषयी तर टिप्पणी द्वारे कळवा !

Next Post
No Comment
Add Comment
comment url