लेख परिचय - मनोरंजन हे आपण सर्वांची एक सर्वात आवडती संकल्पना होय. सुमधुर गाणी, चित्रपट, नाटक अश्या सर्व प्रकार मिळून मनोरंजन ही संकल्पना निर्माण होते. आपल्या मनावर किती पण मोठे चिंतेचे ओझे असुदे आपण एखादे आवडते गाणी व एखादा चित्रपट बघितला म्हणजे सारं विसरून जातो. एक दुःखी असणारा चेहरा चटकन हसरा बनून जातो. अशी मनोरंजनाची व्याख्या आहे. तर आज चित्रपट म्हणजेच तंत्रज्ञान युगातील एक आधुनिक मनोरंजन प्रकार दृक - श्राव्य प्रकार म्हणून ओळखला जातो. तसा हा प्रकार पहिले फक्त दृक होता. पण कालांतराने ह्यामध्ये एक नवीन संकल्पना निर्माण करण्यात आली तीच आज आजच्या लेख द्वारे अभ्यासू.
एरिक टायगरस्टेड - युरोप मधील फिनलंड ह्या देशामधील शोधक होय. त्यांचा जन्म वर्ष - १४ऑगस्ट १८८६ साली फिनलंड मधील हेलसिंकी येथील आहे. ल्युमेरे बंधू ह्यांनी विकसित केलेले एक यंत्र ते म्हणजे छायाचित्रण यंत्र ते यंत्र मुक छायाचित्रण करित असे तर त्या चित्रपटाला आवाज द्यायचा म्हणून ह्यांनी एक चित्रपट ध्वनी तंत्रज्ञान विकसित केले होते.
चित्रपट ध्वनी तंत्रज्ञान - चित्रपट हे एक दृकश्राव्य मनोरंजन साधन म्हणून ओळखल्या जाते. चित्रपट दर्शक यंत्र म्हणजेच छायाचित्रण यंत्र हे ल्युमेरे बंधू ह्यांनी विकसित केले होते. तेव्हाचे चित्रपट हे मुक चित्रपट असायचे हे तर आपल्याला माहितीच असेल. कारण तेव्हा हे छायाचित्रण यंत्र विकसित झाले व त्यामध्ये तेव्हा आवाजाची सुविधा नसावी कदाचित. तर त्यानंतर एरिक टायगरस्टेड ह्यांनी त्या यंत्रमधील ही एक कमतरता पूर्ण करण्यासाठी म्हणजे मुक चित्रपट मध्ये आवाज आणण्याकरिता प्रयत्न केला. आणि चित्रपट ध्वनी तंत्रज्ञान विकसित केले. त्यानंतर चे बरेच चित्रपट हे दृक श्राव्य चित्रपट म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी व्दारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment