लेख परिचय - घडयाळ ही आपण सर्वांना माहितच आहे की एक वेळ बघण्याचे साधन आहे. ज्या व्दारे वेळेचा अंदाज घेता येतो. जगातील प्रथम घडयाळ कशी होती ? त्या घड्याळीचा शोध कोणी लावला ? हे सर्व आपण ह्या पूर्वीच्या लेखामध्ये अभ्यासले आहे. घड्याळीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी आजच्या लेख मध्ये लोलक घड्याळं त्यालाच इंग्लिश मध्ये Pendulum clock असे म्हणून देखील ओळखले जाते. तर हा घड्याळीचा प्रकार नेमका कोणी शोधला ? कोणत्या वर्षी हा प्रकार शोधला गेला ? हे सर्व काही आजच्या लेखमध्ये अभ्यासू.
ख्रिस्तियान हूजेन्स - नेदरलँड मधील एक भौतिकशास्त्र, खगोशास्त्र व गणित ह्या विषयांमध्ये त्यांची विद्वत्ता होती. त्याच प्रमाणे ते शोधक देखील होते. त्यांनी खगोशास्त्रज्ञामध्ये शनीच्या वलयांविषयी तर भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी भौतिकशास्त्रातील ऑप्टिकस नामक संकल्पनेमध्ये त्यांनी आपले योगदान दिले. १६५६ मध्ये घड्याळ ह्या संकल्पनेमध्ये त्यांनी लोलक नामक एक संकल्पनेचा विकास केला. त्यामुळे त्यांना संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळाली. १६३७ मध्ये गॅलिलिओ गॅलिली ने ही संकल्पना शोधली होती.
लोलक घड्याळ -
गॅलिलिओ गॅलिली ह्यांनी १६३७ मध्ये प्रथम लोलक घड्याळ विकसित केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ख्रिस्तियानो हूजेन्स ह्यांनी १६५६ मध्ये दुसरे लोलक घड्याळ विकसित केले.
लोलक घड्याळ हा एक भिंती घडयाळ म्हणून देखील ओळखले जाते. हा इतर घड्याळी प्रमाणेच सारखीच वेळ दाखवते. ह्या मध्ये काही विशिष्ठ वेळेस म्हणजे १२ वाजता एक आवाज निघतो. तो आपल्याला सतर्क करतो की दुपार झाली किंवा मग रात्रीचे १२ वाजले अश्या प्रकारे ते कार्य करते. लोलक घड्याळ मध्ये अनेक छोटे प्रकार आहेत. ते पुढे अनेक लेखाद्वारे अभ्यासू.
Comments
Post a Comment