लेख परिचय - घड्याळ ह्या यांत्राविषयी अनेक शास्त्रज्ञ व संशोधकांनी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यांच्या त्याच प्रयत्न व परिश्रम मुळे आपण आज नवनवीन घड्याळीचे प्रकार बघतो. त्यामधले नवनवीन वैशिष्ट्य पूर्ण काही नवीन संकल्पना विकसित होत असते. तर आज लोलक घड्याळ ही संकल्पना विकसित करणारे गॅलिलिओ गॅलिली ह्यांनी शोधलेले ह्यांनी मांडलेली एक संकल्पना अभ्यासू.
गॅलिलिओ गॅलिली - इटली मधील पेशाने एक अभियंता होते. व भौतिकशस्त्र,खगोशास्त्रज्ञ, नैसर्गिक तत्वज्ञान व गणित ह्या विषयांमध्ये प्रभुत्व होते. ह्यांना आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून देखील ओळखले जाते. अंतराळ मधील ग्रहाची स्थिती व अंतराळ हे कसे आहे बघणे हे ह्यांनी विकसित केलेले एक उपकरण ते म्हणजे दुर्बीण ह्या मुळे ते सहज झाले. आज च्या ह्या लेखामध्ये ह्यांनी विकसित केलेल्या घड्याळ ह्या उपकरणाविषयी माहिती बघत आहोत. ते घड्याळ नामक उपकरण ह्याच्या आधी ख्रिस्तियानो हुजेन्स ह्यांची घड्याळं संबंधी एक संकल्पना आपण बघितली. त्यांची ती संकल्पना १६५६ साली मांडली तर गॅलिलिओ गॅलिली ह्यांनी त्यांच्या आधी १६३७ मध्ये मांडली होती.
लोकल घड्याळ - घडयाळ संबंधी अनेक प्रकार आपण ह्या ब्लॉग मध्ये अभ्यासले आणि पुढे पण अभ्यासू. तर लोलक घड्याळ ही सर्व सामान्य घड्याळीच्या प्रकारासारखी वेळ दाखवण्याचे कार्य करते. पण ह्यामध्ये जर निरक्षण केले तर ह्यामध्ये काहीसे साम्य आता ते कोणते ते तुम्हाला वरील चित्र बघितल्यावर समजेल. तर १६३७ मध्ये निर्माण झालेली ही घड्याळ भिंतीला लावून नसायची तर एखाद्या वस्तू प्रमाणे एका जागी स्थिर स्वरुपात असायची. हे आपल्याला वरील चित्रावरून लक्षात आलेच असेल. तर ख्रिस्तियानो हुजेन्स ह्यांनी विकसित केलेली घड्याळ ही भिंतीवर सहज लावता येत होती. ह्यावरून आपल्या लक्षात येत असेल की एक संकल्पना समोर जाऊन त्यामध्ये कसा बदल होतो. त्यामध्ये कशी सुधारणा होते. येथून पुढे ह्यामध्ये पण आणखी संशोधक व अभियंता ह्यांचे ह्या लोलक घड्याळी संबंधी त्यांची संकल्पना अभ्यासू.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी व्दारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment