लेख परिचय - रेडिओ हा एक श्राव्य माध्यम मनोरंजन साधन आहे. मनोरंजन हे दोन प्रकारामध्ये असते. एक दृक माध्यम व श्राव्य माध्यम आणि आजच्या काळामध्ये दृकश्राव्य हे एक नवीन मनोरंजन प्रकार विकसित झाला आहे. तर रेडिओ हे यांत्रिक यंत्र आपण पूर्वीच्या काळी सर्वत्र जास्त प्रमाणात बघायला मिळायचे. जसे आजच्या काळात भ्रमण ध्वनी प्रत्येक घरामध्ये आहे तसेच हे रेडिओ तांत्रिक यंत्र देखील प्रत्येक घरी असायचेच. ह्या यंत्र मध्ये काळानुसार बरेच बदल झाले. आणि आजच्या काळात आपल्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित भ्रमणध्वनी म्हणजेच Smart Phone ह्या मध्ये एक Application म्हणून उपलब्ध आहे. तर हे रेडिओ चे विज्ञान कोणी विकसित केले ? ते आजच्या लेख मध्ये अभ्यासू.
डॉ. जगदीशचंद्र बोस - एक भारतीय शास्त्रज्ञ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, पुरातत्वशास्त्र व वनस्पतीशास्त्र ह्या चार विषयमध्ये प्रभुत्व मिळवले. त्याच प्रमाणे रेडिओ विज्ञान ह्या संकल्पनेत त्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांना भारतामधील प्रथम वैज्ञानिक संशोधक म्हणून व रेडिओ विज्ञान जनक ओळखल्या जाते.
रेडिओ - रेडिओ ही संवाद माध्यम आहे. म्हणजेच श्राव्य माध्यम म्हटले तरी चालेल. रेडिओ चे एक स्टेशन असते. जेथून एक निवेदक बोलत असतो. एखादी बातमी सांगणे हे पूर्वी जास्त प्रमाणात होत असे. कारण तेव्हा आजच्या सारखे दृकश्राव्य साधन टी व्ही हे साधन विकसित झाले नव्हते. रेडिओ हा सकाळची प्रभात गीते व दिवस भर त्यामध्ये दिवस भर त्यामध्ये मनोरंजक कार्यक्रम सुरू राहत असत.
• जगातील प्रथम रेडिओ स्टेशन १८१८ मध्ये न्यूयॉर्क मधील हायब्रिज ली. डी. फॉरेस्ट ह्यांनी सुरू केले होते.
• जगातील दुसरे रेडिओ स्टेशन १९१९ मध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये ली. डी. फॉरेस्ट ह्यांनी सुरू केले होते.
* रेडिओ स्टेशन - ह्यालाच प्रसरणकर्ता म्हणून देखील संबोधले जाते. येथून एका विशिष्ट जागेतील रेडिओ माध्यमांना केंद्रित धरून त्याद्वारे प्रसारण केले जाते. म्हणजेच एका रेडिओ मध्ये बातमी चालू असेल तर ती त्या जागेतील एका रेडिओ स्टेशन द्वारे नियंत्रित केले जाते. त्यामुळे ह्या रेडिओ स्टेशन चे महत्व जास्त आहे.
डॉ. जगदीशचंद्र बोस ह्यांनी विकसित केलेला मायक्रोवेव्ह ऑप्टिकस संकल्पनेचा रेडिओ.
डॉ. जगदीशचंद्र बोस ह्यांचे रेडिओ संबंधी शोध संकल्पना -
ह्यांनी रेडिओ स्टेशन च्या लहरी संबंधी म्हणजेच मॉक्रोवेव्ह ऑप्टिकस संबंधी शोध लावला. ज्या द्वारे आज आपल्या एका रेडिओ स्टेशन मधून एखादे कार्यक्रम प्रसारित केला असेल तर तो तेथ आपल्याला आपल्या रेडिओ उपकरणा द्वारे ऐकायला येतो. ती प्रत्यक्ष पुरावा म्हणून त्यांनी एक उपकरण देखील विकसित केलं. ते वरील चित्र मध्ये बघू शकता.
मायक्रोव्हेव ऑप्टिकस -
ही रेडिओ साधना संबंधी एक संकल्पना आहे. ही संकल्पना डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी विकसित केली. ह्याच्या द्वारे रेडिओ स्टेशन ते रेडिओ साधन ह्यांचा संबंध जोडला जातो. ही मुख्यत्वे हर्ट्झ द्वारे नियंत्रित होते. जेवढे जास्त हर्ट्झ तेवढं रेडिओ स्टेशन व रेडिओ साधन संबंध मजबूत होतो.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी द्वारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment