लेख परिचय - आपल्या कडून इतरांना नेहमीच आनंद मिळेल असे आपण इतरांशी वागावे. आपले जीवन हे एकट्याने कधीच जगू शकत नाही त्याला इतर व्यक्तींची सोबत ही लागतेच. त्यामुळेच इतर व्यक्तींशी चांगले वागले की आपल्या मनाला खूप बरे वाटते. इतरांना गरज पडल्यास मदत करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते केलीच पाहिजे. मदत म्हणजे इतरांना आधार देणे जिथे गरज अश्या वेळी इतरांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे. मदत ही प्रत्येकानी केलीच पाहिजे कारण आपल्या एक मदतीची गरज इतरांना खूप काही देऊन जाते. तर आजच्या लेख चा विषय मदत ह्या विषयी माहिती बघू.
मदत -
एक अशी गरज जी प्रत्येक व्यक्तीला प्रसंगानुरूप कधी तरी गरजेची वाटते. मदत ही आपल्याकडून इतरांना झाली की आपल्या मनाला जे समाधान वाटते. त्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. मदत करताना कसलाही संकोच धरू नये. तर निसंकोच पणे इतरांना करावी. आपल्या एका मदतीने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येऊ शकतो. तेव्हाचा प्रत्यक्ष तो प्रसंग आपल्या चेरहऱ्यावर देखील आनंद आणतो. अगदीच तेथून आपल्यालाही आणखी गरज असलेल्या व्यक्तीला मदत करावी असं वाटेल.
मदतीचा हात -
आपल्याकडून इतरांना सतत मदत व्हावी असे मलाही व्यक्तिगत वाटते. कारण दैनंदिन जीवनात बरेच प्रसंग डोळ्यासमोर असे येतात की आपलं सर्वस्व पणाला लावून इतरांना मदत कशी होईल ह्या कडे आपले लक्ष जाते. आपला ही मदतीचा हात इतरांना गरज म्हणून समोर येईल असे आपल्याला वाटते.
आपल्या मित्रांचे किंवा एखाद्या व्यक्तीचे मनोबल खचले असेल तर त्याचे मनोबल वाढवण्यासाठी आपले शब्द तिथे त्याला पुन्हा नवीन सुरुवात करावी असेच वाटू शकते. जिथे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपली गरज नसते. तिथे आपले शब्द आपले बोल हे महत्वाची भूमिका पार पाडतात. मदत ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अश्या दोन्ही प्रकारे केली जाऊ शकते. आपण नेहिमीच तयार राहायला हवे. कारण आपला एक मदतीचे हात किंवा मदतीचे बोल इतरांना खूप काही देऊन जातो. आपल्या पुढील एखादा चेहरा रडत असेल ना त्याचे अश्रू आपल्या हातांनी नव्हे तर आपल्या शब्दांनी देखील ते अश्रू थांबवू शकतो. त्याला पाठबळ देऊ शकतो. तो पुन्हा सगळे विसरून नवी सर्वात करेल असे पाठबळ आपल्या शब्दांमध्ये व आपल्या मदातीमध्ये आहे.
आपल्या मदतीची गरज -
आपल्या मदतीची गरज समाजातील बऱ्याच गरजू लोकांना आहे. त्यांना आधार हा आपल्या कडून भेटायला पाहिजे. अनेक व्यक्तींना आधाराची गरज आहे. त्यांच्या समस्या ह्या सोडविल्या पाहिजे. कुणाला आर्थिक तर कुणाला मानसिक व भावनिक आधाराची गरज आहे. गरजूंना मदत करत आपण आपले आयुष्य जगायला हवे.
• आपल्या एका मदतीच्या हाताची कुणाला तरी गरज आहे. तेव्हा ते कार्य आपण आपले कर्तव्य म्हणून पूर्ण करायला हवे. जिथे आपल्या शब्द संपदेची गरज आहे तिथे त्या द्वारे मदत केली पाहिजे.
तुम्हाला हा लेख काय प्रेरणा देऊन गेला तो टिप्पणी द्वारे नक्की कळवा !
Comments
Post a Comment