दूरदर्शन शोध - जॉन लोगी बेयर्ड
लेख परिचय - आज प्रत्येक घरामध्ये दिसणारं एक मनोरंजनाचे साधन ज्याला आपण इंग्रजी भाषेत Television आणि संक्षिप्त रुपात TV असे देखील म्हणतो. आजच्या काळात आपण घरी असून दूरचे चित्रीकरण सहज बघू शकतो. ते एका छोट्या दूरदर्शन नामक साधना द्वारे. दूरचे चित्रीकरण सहज साध्य करून दाखवणारे एक साधन म्हणजे दूरदर्शन अशी साधी सोपी व्याख्या आहे ह्या साधनाची. तर आजच्या ह्या लेखामध्ये हे साधन कोणी विकसीत केलं ? कधी व केव्हा ? ह्या विषयी आजच्या लेखामध्ये माहिती अभ्यासू.
जॉन लोगी बेयर्ड - स्कॉटलंड मधील एक शोधक, उद्योजक व अभियंता होते. Television ही संकल्पना सर्व प्रथम ह्यांनी शोधून काढली व त्यामध्ये आवश्यक ते बदल सुध्दा घडून आणले. रंगीत छायाचित्रण ही संकल्पना प्रत्यक्षात ह्यांनी शोधलेल्या दूरदर्शन ह्या उपकरणांमध्ये विकसित केली.
दूरदर्शन संकल्पना -
ही एक आधुनिक तंत्रज्ञान संकल्पना आहे. मनोरंजन प्रकार मध्ये समाविष्ट आहे. घरी राहून आपल्या कुटुंब सोबत दूरदर्शन द्वारे एखादे चित्रपट व एखादा कार्यक्रम देखील आपण बघू शकतो. कुठे दूर प्रक्षेपण होत असेल तर ते सहज आपण इथे बघू शकतो. जे तिथे सुरू असलेलं ते चित्रीकरण स्वरूपात आपल्या एका छोट्या दूरदर्शन नामक साधनांवर बघू शकतो. मुख्य म्हणजे तत्कालीन म्हणजे ज्या काळी हा शोध लागला तेव्हा पासून ते आज पर्यंत ह्यात अनेक बदल झाले. ते कसे तर काही नवीन तंत्रज्ञान विकसीत झाले. आजच्या काळात आज ते बघत आहोच एक छोटं दूरदर्शन ते आज लांबी व रुंदी मध्ये वाढलेलं एक साधन दिसते. व त्याचा पडदा त्यालाच Screen असे म्हणतो. त्यामधे बदल झाला हे आपल्याला दिसून येते.
दूरदर्शन शोध -
दूरदर्शन हे एक मनोरंजन प्रकारातील एक साधन आहे. ह्या साधनाचा शोध स्कॉटलंड मधील जॉन लोगी बेयर्ड यांनी १९२५ मध्ये प्रत्यक्षात वापर करण्यात समोर आणले. हे साधन शोध करत असताना अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये सुधारणा देखील केल्या गेल्या.
रंगीत चित्रीकरण ही संकल्पना फार महत्वाची होती. चित्रपट तेव्हा काळया व पांढरा ह्या रंगाची चित्र असत. तर जॉन लोगी बेयर्ड यांनी रंगीत चित्र दर्शवणारी एक पिक्चर टुब विकसीत केली. त्याचा वापर ह्या दूरदर्शन मध्ये करण्यात आला. तेव्हा पासून रंगीत दूरदर्शन हे विकसित झाले.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिप्पणी द्वारे नक्की कळवा.