Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

पिसांची लेखणी (Quil pen )

लेख परिचय - लेखणी ही एक लिखाणाचे एक साधन आहे. जेव्हा पासून लिखाण ह्या संकल्पनेचा शोध लागला. तेव्हा पासून अनेक प्रकारचे लेखणी संदर्भात शोध समोर आलेत. त्या काही प्रकाराविषयी आपण ह्या ब्लॉग मध्ये लेख वाचलेत असेल. झरणी लेखणी हा एक प्रकार आपण अभ्यासला आहे. ह्या आधी तर आजच्या लेख मध्ये असा एक प्रकार बघणार आहोत त्याविषयी माहिती बघणार आहोत. तर तो प्रकार म्हणजे पिसांची लेखणी नामक एक प्रकार त्यालाच इंग्रजी मध्ये Quil pen असे देखील म्हणतात. त्या विषयी आज अभ्यासू.  पिसांची लेखणी -             प्राचीन काळी ह्या लेखणी चा जास्त प्रमाणात वापर होत असे. पण आजच्या काळी सुध्दा काही ठिकाणी हा प्रकार दिसून येतो. तो थोडा वेगळ्या पद्धतीने आहे. काही पक्षांची पिसांच्या द्वारे ही लेखणी तयार केली जाते. पिसाचे खालचे टोक हे तीक्ष्ण असते. त्यामुळे लिखाण करताना आराम दायक वाटते. व अक्षर देखील छान येते. ह्यावरून हा लेखणीचा प्राचीन आहे असं दिसून येते. पिसांची लेखणी ह्या लेखणी ची रचना ही झरनी लेखणी सारखी अंतर्गत शाई ची व्यवस्था नसते. तर बाह्य अंगाने शाई मध्ये त्या लेखणीचे टोक...

एकांत

लेख परिचय - आपण एकटे कधीच राहू शकत नाही. सतत कुणाशी तरी बोलत कुणाला वेळ देत आपण इतरांशी वागत असतो. इतरांना वेळ देतो. इतरांच्या समस्या सोडवत प्रसंगी त्यानं योग्य तो सल्ला देखील देतो. मदत करतो. इतरांशी चांगले वागणे हे नक्की करावे सोबतच आपण आपल्याला वेळ देखील द्यायला हवा हे गरजेचे आहे. कारण आपल्या समस्यांना योग्य तो वेळ देणे गरजेचे आहे. त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. तेव्हा आपण आपल्याला वेळ हा दिलाच पाहिजे. त्यालाच एकांत वेळ असे म्हणतात. म्हणजे आपण एकट्याने स्वतः ला वेळ देणे स्वतः च्या समस्या स्वः सोडवणे गरजेचे आहे. तर आज त्या विषयी अभ्यासू व माहिती बघू.  एकांत - स्वतः च स्वतःचा जेव्हा वेळ देतो आपण आपल्याला समजून घेतो. त्या स्थिती ला एकांत असे म्हणतात. आपण कधी कुणाला वाईट संबोधित केले किंवा कुणाला रागावले तर तर आपल्या मनाला वाईट वाटते पश्चाताप होतो. तेव्हा आपण एकटे राहावे असं वाटते. ते वाटणे स्वाभाविक आहे. कारण मनाचा राग हा शांत चित्ताने शांत होतो. आणि त्यासाठी आपण एकट्याने त्या घडलेल्या प्रसंगावर विचार करणे आवश्यक आहे. तोच एक त्यावरती उपाय असतो. तेव्हा शांतता ही अतिशय मह...

दूरदर्शन शोध - जॉन लोगी बेयर्ड

लेख परिचय - आज प्रत्येक घरामध्ये दिसणारं एक मनोरंजनाचे साधन ज्याला आपण इंग्रजी भाषेत Television आणि संक्षिप्त रुपात TV असे देखील म्हणतो. आजच्या काळात आपण घरी असून दूरचे चित्रीकरण सहज बघू शकतो. ते एका छोट्या दूरदर्शन नामक साधना द्वारे. दूरचे चित्रीकरण सहज साध्य करून दाखवणारे एक साधन म्हणजे दूरदर्शन अशी साधी सोपी व्याख्या आहे ह्या साधनाची. तर आजच्या ह्या लेखामध्ये हे साधन कोणी विकसीत केलं ? कधी व केव्हा ? ह्या विषयी आजच्या लेखामध्ये माहिती अभ्यासू.  जॉन लोगी बेयर्ड - स्कॉटलंड मधील एक शोधक, उद्योजक व अभियंता होते. Television ही संकल्पना सर्व प्रथम ह्यांनी शोधून काढली व त्यामध्ये आवश्यक ते बदल सुध्दा घडून आणले. रंगीत छायाचित्रण ही संकल्पना प्रत्यक्षात ह्यांनी शोधलेल्या दूरदर्शन ह्या उपकरणांमध्ये विकसित केली.                                                                             ...

चित्रपट छायांकन यंत्र

लेख परिचय - चित्रपट ही एक मनोरंजन संबंधी एक संकल्पना आहे. मनोरंजन मध्ये दृक - श्राव्य अश्या दोन्ही प्रकारे समावेश केला जातो. रेडिओ मधील गाणी हे फक्त ऐकू शकतो म्हणून ते श्राव्य प्रकारात येतं. तर चित्रपट सारखे मनोरंजन प्रकार जे डोळ्यांनी बघितले जातात व कानांनी ऐकले पण जातात तर ते दृक - श्राव्य ह्या प्रकारात येते. तर आजच्या लेख मध्ये मनोरंजन मधील एक अशाच प्रकार चित्रपट हे प्रत्यक्ष दाखवणारे यंत्र कोणी विकसित केलं ? ते कधी कोठे व केव्हा ? विकसीत झाले ह्या विषयी आजच्या लेखामध्ये अभ्यासणार आहोत.  लिओन बाउली - एक फ्रान्स चे शोधक होते. Cinematography ह्या नावाने हे यंत्र ओळखलं जाते. Cinematography हे नाव फ्रान्स चे शोधक लिओन बाऊली ह्यांनी हे सर्व प्रथम (१८९२) शोधेले. काही आर्थिक अडचणी मुळे ते ह्यामध्ये सुधारणा करू शकले नाही व नंतर ह्यांचे हे पेटंट लुमियरे बंधू ह्यांनी घेतले व त्यात सुधारणा केली.                                    लिओन बाऊली ह्यांनी शोधलेले Cinematography नामक ...

मदत

लेख परिचय -  आपल्या कडून इतरांना नेहमीच आनंद मिळेल असे आपण इतरांशी वागावे. आपले जीवन हे एकट्याने कधीच जगू शकत नाही त्याला इतर व्यक्तींची सोबत ही लागतेच. त्यामुळेच इतर व्यक्तींशी चांगले वागले की आपल्या मनाला खूप बरे वाटते. इतरांना गरज पडल्यास मदत करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते केलीच पाहिजे. मदत म्हणजे इतरांना आधार देणे जिथे गरज अश्या वेळी इतरांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे. मदत ही प्रत्येकानी केलीच पाहिजे कारण आपल्या एक मदतीची गरज इतरांना खूप काही देऊन जाते. तर आजच्या लेख चा विषय मदत ह्या विषयी माहिती बघू.  मदत -                एक अशी गरज जी प्रत्येक व्यक्तीला प्रसंगानुरूप कधी तरी गरजेची वाटते. मदत ही आपल्याकडून इतरांना झाली की आपल्या मनाला जे समाधान वाटते. त्याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. मदत करताना कसलाही संकोच धरू नये. तर निसंकोच पणे इतरांना करावी. आपल्या एका मदतीने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येऊ शकतो. तेव्हाचा प्रत्यक्ष तो प्रसंग आपल्या चेरहऱ्यावर देखील आनंद आणतो. अगदीच तेथून आपल्यालाही आणखी गरज असलेल्या व्यक्तीला मदत...

रेडिओ विज्ञान जनक - डॉ. जगदीशचंद्र बोस

लेख परिचय -  रेडिओ हा एक श्राव्य माध्यम मनोरंजन साधन आहे. मनोरंजन हे दोन प्रकारामध्ये असते. एक दृक माध्यम व श्राव्य माध्यम आणि आजच्या काळामध्ये दृकश्राव्य हे एक नवीन मनोरंजन प्रकार विकसित झाला आहे. तर रेडिओ हे यांत्रिक यंत्र आपण पूर्वीच्या काळी सर्वत्र जास्त प्रमाणात बघायला मिळायचे. जसे आजच्या काळात भ्रमण ध्वनी प्रत्येक घरामध्ये आहे तसेच हे रेडिओ तांत्रिक यंत्र देखील प्रत्येक घरी असायचेच. ह्या यंत्र मध्ये काळानुसार बरेच बदल झाले. आणि आजच्या काळात आपल्या आधुनिक तंत्रज्ञान विकसित भ्रमणध्वनी म्हणजेच Smart Phone ह्या मध्ये एक Application म्हणून उपलब्ध आहे. तर हे रेडिओ चे विज्ञान कोणी विकसित केले ? ते आजच्या लेख मध्ये अभ्यासू.                 डॉ. जगदीशचंद्र बोस -  एक भारतीय शास्त्रज्ञ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, पुरातत्वशास्त्र व वनस्पतीशास्त्र ह्या चार विषयमध्ये प्रभुत्व मिळवले. त्याच प्रमाणे रेडिओ विज्ञान ह्या संकल्पनेत त्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांना भारतामधील प्रथम वैज्ञानिक संशोधक म्हणून व रेडिओ विज्ञान जनक ओळखल्या ज...

यांत्रिक स्वरूपाची मनगटी घड्याळ

लेख परिचय - घड्याळ ह्या संकल्पनेविषयी बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकाराविषयी ह्या ब्लॉग मध्ये माहिती बघितली. तर आज एका लेख मध्ये एका यांत्रिक स्वरूपाची घड्याळ ह्या विषयी माहिती बघू. तर यांत्रिक घड्याळ ही कशी कार्य करते ? तिचे अंतर्गत स्वरूप कसे असते ? अंतर्गत व्यवस्था कश्या प्रकारची असते ? ह्या विषयी अधिक माहिती आजच्या लेख मध्ये बघू.  घड्याळ - वेळेचं गणित सांगणारं एक यंत्र म्हणजे घड्याळ. दिवसाच्या पहाटे पासून ते रात्री पर्यंत आपण ह्या साधना द्वारे वेळ बघत असतो. वेळ ही आपल्या दैनंदिन जीवनात नियोजन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. कोणत्या वेळेला काय करावे हे नियोजन पूर्वक एखादा आपण वेळेच्या द्वारे करत असतो. त्यामुळे घड्याळ ह्या यंत्राचे महत्त्व आपल्या दृष्टीने खूप आहे. यांत्रिक घड्याळ -                सर्व प्रथम यांत्रिक घड्याळ म्हणजे काय ते समजून घेऊ. तर घड्याळ म्हणजे वेळ दाखवणारं एक यंत्र. यांत्रिक घड्याळ हे म्हणजे एक विशिष्ट यंत्रणेच्या आधारे चालत असते. म्हणजे त्या घड्याली मध्ये जशी वेळ दाखवण्याची यंत्रणा विकसित केल...