Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

ध्वनी मुद्रण यंत्र - वाल्डेमार पॉलसन

लेख परिचय - ध्वनी म्हणजे एखादा आवाज होय. मग तो आपल्या बोलण्याचा असेल किंवा आपल्या परिसरातील इतर छोटे मोठे ध्वनी निर्माण करणारे घटकांचा असेल. ध्वनी हा फक्त कानाद्वारे एकला जाऊ शकतो. ध्वनी विषयी संपूर्ण माहिती सांगणारे शास्त्र म्हणजे ध्वनीशास्त्र भौतिकशास्त्र ह्या विषयाची उपशाखा म्हणून ओळखल्या जाते. आणि दुसरे एक म्हणजे संगीत आपण मनोरंजन प्रकारांपैकी एक होय. ध्वनी मुद्रण म्हणजे ध्वनी ला एखाद्या यंत्राव्दारे त्या तसे साठवून ठेवणे. ते यंत्र कोणते ? व कोणी शोधले ?  हे आजच्या लेख द्वारे अभ्यासू.  वाल्डेमार पॉलसन - युरोप मधील डेन्मार्क ह्या राष्ट्रांमधील एक अभियंता होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८६९ डेन्मार्क मधील कोपहेगन येथील. त्यांचे रेडिओ ह्या संकल्पना मध्ये महत्वाचे योगदान दिले. आज जो काही ध्वनी किंवा एखादे गाणे असेल ते मुद्रण होते मग ते आपण ऐकू शकतो. ते यंत्र म्हणजेच ध्वनी मुद्रण यंत्र चा शोध हा १८९८ मध्ये लावला.                                        १८९...

चित्रपट ध्वनी तंत्रज्ञान शोध - एरिक टायगरस्टेड

लेख परिचय - मनोरंजन हे आपण सर्वांची एक सर्वात आवडती संकल्पना होय. सुमधुर गाणी, चित्रपट, नाटक अश्या सर्व प्रकार मिळून मनोरंजन ही संकल्पना निर्माण होते. आपल्या मनावर किती पण मोठे चिंतेचे ओझे असुदे आपण एखादे आवडते गाणी व एखादा चित्रपट बघितला म्हणजे सारं विसरून जातो. एक दुःखी असणारा चेहरा चटकन हसरा बनून जातो. अशी मनोरंजनाची व्याख्या आहे. तर आज चित्रपट म्हणजेच तंत्रज्ञान युगातील एक आधुनिक मनोरंजन प्रकार दृक - श्राव्य प्रकार म्हणून ओळखला जातो. तसा हा प्रकार पहिले फक्त दृक होता. पण कालांतराने ह्यामध्ये एक नवीन संकल्पना निर्माण करण्यात आली तीच आज आजच्या लेख द्वारे अभ्यासू.  एरिक टायगरस्टेड - युरोप मधील फिनलंड ह्या देशामधील शोधक होय. त्यांचा जन्म वर्ष - १४ऑगस्ट १८८६ साली फिनलंड मधील हेलसिंकी येथील आहे. ल्युमेरे बंधू ह्यांनी विकसित केलेले एक यंत्र ते म्हणजे छायाचित्रण यंत्र ते यंत्र मुक छायाचित्रण करित असे तर त्या चित्रपटाला आवाज द्यायचा म्हणून ह्यांनी एक चित्रपट ध्वनी तंत्रज्ञान विकसित केले होते.                        ...

लोलक घड्याळ - भाग २ ( pendulum clock ) - गॅलिलिओ गॅलिली

लेख परिचय - घड्याळ ह्या यांत्राविषयी अनेक शास्त्रज्ञ व संशोधकांनी बरेच प्रयत्न केले आहेत. त्यांच्या त्याच प्रयत्न व परिश्रम मुळे आपण आज नवनवीन घड्याळीचे प्रकार बघतो. त्यामधले नवनवीन वैशिष्ट्य पूर्ण काही नवीन संकल्पना विकसित होत असते. तर आज लोलक घड्याळ ही संकल्पना विकसित करणारे गॅलिलिओ गॅलिली ह्यांनी शोधलेले ह्यांनी मांडलेली एक संकल्पना अभ्यासू.  गॅलिलिओ गॅलिली - इटली मधील पेशाने एक अभियंता होते. व भौतिकशस्त्र,खगोशास्त्रज्ञ, नैसर्गिक तत्वज्ञान व गणित ह्या विषयांमध्ये प्रभुत्व होते. ह्यांना आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून देखील ओळखले जाते. अंतराळ मधील ग्रहाची स्थिती व अंतराळ हे कसे आहे बघणे हे ह्यांनी विकसित केलेले एक उपकरण ते म्हणजे दुर्बीण ह्या मुळे ते सहज झाले. आज च्या ह्या लेखामध्ये ह्यांनी विकसित केलेल्या घड्याळ ह्या उपकरणाविषयी माहिती बघत आहोत. ते घड्याळ नामक उपकरण ह्याच्या आधी ख्रिस्तियानो हुजेन्स ह्यांची घड्याळं संबंधी एक संकल्पना आपण बघितली. त्यांची ती संकल्पना १६५६ साली मांडली तर गॅलिलिओ गॅलिली ह्यांनी त्यांच्या आधी १६३७ मध्ये मांडली होती.  १६३७ मध्ये गॅलिलिओ ...

लोलक घड्याळ - भाग १ ( pendulum clock ) - ख्रिस्तियान हुजेन्स

लेख परिचय - घडयाळ ही आपण सर्वांना माहितच आहे की एक वेळ बघण्याचे साधन आहे. ज्या व्दारे वेळेचा अंदाज घेता येतो. जगातील प्रथम घडयाळ कशी होती ? त्या घड्याळीचा शोध कोणी लावला ? हे सर्व आपण ह्या पूर्वीच्या लेखामध्ये अभ्यासले आहे. घड्याळीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी आजच्या लेख मध्ये लोलक घड्याळं त्यालाच इंग्लिश मध्ये Pendulum clock असे म्हणून देखील ओळखले जाते. तर हा घड्याळीचा प्रकार नेमका कोणी शोधला ? कोणत्या वर्षी हा प्रकार शोधला गेला ? हे सर्व काही आजच्या लेखमध्ये अभ्यासू.  ख्रिस्तियान हूजेन्स -  नेदरलँड मधील एक भौतिकशास्त्र, खगोशास्त्र व गणित ह्या विषयांमध्ये त्यांची विद्वत्ता होती. त्याच प्रमाणे ते शोधक देखील होते. त्यांनी खगोशास्त्रज्ञामध्ये शनीच्या वलयांविषयी तर भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी भौतिकशास्त्रातील ऑप्टिकस नामक संकल्पनेमध्ये त्यांनी आपले योगदान दिले. १६५६ मध्ये घड्याळ ह्या संकल्पनेमध्ये त्यांनी लोलक नामक एक संकल्पनेचा विकास केला. त्यामुळे त्यांना संशोधक म्हणून प्रसिद्धी मिळाली. १६३७ मध्ये गॅलिलिओ गॅलिली ने ही संकल्पना शोधली होती.         ...

झरणी ( फाऊंटेन ) लेखणी

लेख परिचय- आपल्या ब्लॉग मध्ये याआधीच लेखणी संदर्भात काही संकल्पना आपण समजून घेतल्या आहेत. लेखणीचे अनेक प्रकार आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत ह्या लेखणी मध्ये अनेक बदल झाले. काही सुधारणा झाल्या व काही प्रकार नवीन विकसीत झाले. असाच एक प्रकार आजच्या लेख मध्ये अभ्यासू एक आधुनिक लेखणी म्हटले तरी योग्यच ठरेल. एक नवीन संकल्पना एक नवीन प्रकार अशी तिची ओळख आहे. ती म्हणजे झरणी लेखणी अर्थातच फाऊंटेन लेखणी ही कशी असते. तिची रचना ह्याविषयी आजच्या लेख मध्ये अभ्यासू.  झरनी लेखणी - ही लेखणी एक आगळी वेगळी लेखणी आहे. म्हणजे इतर लेखणी प्रमाणे शाई ची आवश्यकता ह्या लेखणी ला आहे. पण ह्याच्या रचनेनुसार ह्याची शाई ची व्यवस्था ही त्या लेखनीच्य आताच केलेली असते. आणि दुसरे म्हणजे लिखाण करावयाचे टोक हे इतर लेखणी पेक्षा वेगळी प्रकारची अशी असते. ही लेखणी आजच्या काळात तर फार ठिकाणी वापरली जात नाही. फार कमी ठिकाणी दिसून येते. काळानुसार लेखणी मध्ये बदल होऊन त्यापेक्षा ही नवीन लेखणी आज आपण वापरतो. तर ही लेखणी कुणाकडे बघायला मिळेल तर ! वस्तू संग्रहालये मध्ये किंवा ज्यांच्या कडे लेखणी...

लेखणी - एक लिखाणाचे साहित्य

लेख परिचय - आपल्या शालेय वयापासून ते आयुषयभरासाठी आपल्या सोबत असणारे साहित्य म्हणजेच लेखणी किंवा पेन होय. कागदावर एखादी रेष जरी काढावयाची असेल तर आपण लेखणी ची मदत घेतो. अशी ही अद्वितीय साहित्य आहे. हे  अती प्राचीन काळी शोधले गेलेलं साहित्य आहे. त्यामध्ये अनेक बदल झालेत पण त्याचे कार्य व त्याचे वैशिष्टे ह्यांमध्ये मात्र कसल्याही प्रकारे बदल झाला नाही. ते आजच्या ह्या लेख मध्ये आपण ह्या साहित्य विषयी माहिती बघू.  लेखणी - प्राचीन काळी जेव्हा लिखाण तंत्राचा शोध लागला. तेव्हा एक पिस पेन नामक एक लेखणीचा वापर केला जात असे. नंतर काही सुधारणा होऊन त्यामध्ये बरेच प्रकार आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात. लेखणी म्हणजे लिखाण करणारे साहित्य होय.                लेखणी ही संकल्पना प्रत्यक्षात लिखाण संबंधी आहे. एका शाई द्वारे हे साहित्य चालत असते. म्हणजेच एखाद्या कागदावरी एखादी रेष किंवा अक्षर काढावयाचे जरी असेल तरी शाई ही त्या लेखणी मध्ये असणे खूप महत्त्वाचे असते. म्हणजेच शाई ही लेखणी वीना अपूर्ण असते. तर लिखाण साठी कागद हे साधन हवे असते....

स्व च्या जन्मदिनीचे एक रोपटे

लेख परिचय - निसर्ग हा सर्व सजीव सृष्टी चा निर्माता आहे. आज आपले अस्तित्व हे केवळ निसर्ग मुळेच आहे. इथे आपल्या सारखेच अनेक जीव किंवा प्राण्यांचा जन्म होतो. ते पण आपल्या सारखेच इथे जीवन व्यथित करतात. निसर्ग मुळे आपल्या सर्व सजीव सृष्टीच इथे जन्म होतो. ही निसर्ग नामक संकल्पना ह्या आपल्या पृथ्वबाहेर इतर कुठेच बघायला मिळत नाही. म्हणजेच काय तर इतर ग्रहवरती ही संकल्पना शोधून पण सापडणार नाही. अशी ही अद्वितीय संकल्पना आहे. तेव्हा आपले एक कर्तव्य म्हणून ह्या निसर्गाचे संवर्धन व संगोपन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपला जन्म व निसर्ग ह्याविषयी आजच्या लेख मध्ये महिती बघू. निसर्ग - एक अशी संकल्पना जी कुठे वाचून व लिहून समजत नाही तर ह्याच निसर्गाच्या अनेक क्षेत्रामध्ये जाऊन तिथे निसर्गाचे दर्शन घेतले तरच ही अद्वितीय संकल्पना प्रत्यक्षात समजेल. ह्यावरून लक्षात येईल की निसर्ग ही किती मोठी अशी व्यापक संकल्पना आहे. ही कुठे शोधून नाही पण जिथे आहे ना तेथील क्षेत्राचे पूर्ण अंगाने भ्रमंती करून व त्याचे दर्शन घेऊन ती संकल्पना कळेल. येथे अनेक सजीव सृष्टी चे अस्तीत आहे. असे चित्र पृथ्वी बाहेर कुठे ब...

भ्रमणध्वनी - आधुनिक काळातील एक संपर्क साधन

लेख परिचय - आजच्या काळातील आपले जीवन अतिशय गतीशील झालेले आहे. तंत्रज्ञान ह्या संकल्पनेने आपले सम्पूर्ण जीवन गतिशील करून अनेक शोध ह्या तंत्रज्ञान युगामध्ये लावले गेले तसेच आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार त्यात अनेक साधने विकसित झालेले आहेत. आज जर कुठे जायचे असेल तर काहीच वेळात आपण तिथे पोहचू शकतो. ह्यावरून असे लक्षात येते की आपले राहणीमान व अनेक काही कार्यात ह्यामुळे गती मिळाली तशीच एक प्रकारे गती आपल्या संपर्क साधण्यास मिळाली ती कशी मिळाली ती आजच्या लेख मध्ये बघु.  संपर्क व संदेश वहन - पूर्वीचे संदेशवहन व आजचे ह्यात खूप फरक दिसून येतो. ते कसे बरे तर ! पूर्वी माणूस इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधत असे तर आजच्या काळात तोच अप्रत्यक्ष पने साधताना दिसतो. पूर्वी संपर्काचे साधन उपलब्ध नव्हते तेव्हा एक व्यक्ती प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन संवाद करत असे. तर आज तोच एका जागेवरून एका तंत्रज्ञान साधनांद्वारे म्हणजेच भ्रमणध्वनी व्दारे तोच संवाद काहीच सेकांदामध्ये साधत असतो.आणि संदेशवहन च्या बाबतीत पण तसेच आहे. पूर्वी हे साधन उपलब्ध होते. त्याकाळी ह्या साधनाचे अनेक प्रकार उपलब्ध हो...